नळदुर्ग नगरपालिकेत विषय समितीच्या सभापती पदांच्या निवडी बिनविरोध ; ४ भाजपचे तर दोन काँग्रेसचे सभापतीपदी निवड


नळदुर्ग,दि.२४:

येथील नगरपरिषदेत स्थायी समिती तसेच विविध विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.  आज  शनिवार दि.२४ जानेवारी  रोजी झालेल्या विशेष बैठकीत सहा सभापती पैकी चार भाजप- शिंदे सेना महायुतीत तर दोन काँग्रेसच्या सभापतीपदी  निवड करण्यात आली आहे.


या निवडीत स्थायी समिती अध्यक्षपदी नगराध्यक्ष बसवराज धरणे, तर नियोजन व विकास समितीच्या सभापती म्हणून उपनगराध्यक्ष नय्यर जागीरदार यांची  निवड करण्यात आली .तर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शशिकांत पुदाले यांची, पाणीपुरवठा व जल नि:सारण समितीच्या सभापतीपदी तानाजी जाधव,  स्वच्छता व आरोग्य,दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी श्रीमती सुमन ठाकूर , महिला व बालविकास समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या नगरसेविका सौ अपर्णा बेडगे , शिक्षण, क्रीडा व सांस्कृतीक समितीच्या सभापतीपदी इमाम शेख आदीची निवड करण्यात आली आहे.

वरील सर्व समित्यांची निवडी  बिनविरोध पार पडल्या असुन नुतन सभापती व सदस्यांचे सत्कार करण्यात आले.पिठासीन अधिकारी म्हणून वाशी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुरेखा कांबळे, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी, तर सभा कामकाज अजय काकडे यांनी काम पहिले, याप्रसंगी सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष काँग्रेसचे नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते, सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.निवड झालेल्या पदाधिका-यांच्या समर्थकांनी फटाक्याची अतीषबाजी करण्यात केली.
 
Top