अर्चनाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 
नळदुर्गमध्ये रंगला खेळ पैठणीचा - भाजपचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा स्तुत्य उपक्रम

नळदुर्ग,दि.२५:

मकर संक्रांतीच्या निमित्ताने नळदुर्ग नगरीचे नूतन नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या वतीने  महिलांसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. सौ.अर्चनाताई पाटील यांच्या  प्रमुख उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम मोठ्या थाटात  पार पडला. महिलांसाठी खास आकर्षण असलेले होम मिनिस्टर हा कार्यक्रम यावेळी आयोजित केला होता..सुप्रसिद्ध वक्ते व निवेदक प्रा.संतोष पवार यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला .

यामध्ये नळदुर्ग शहरातील हजारो महिला मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये नळदुर्ग शहरांमध्ये खास महिला भगिनींसाठी भव्य कार्यक्रम नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी आयोजित केला होता.
या हळदीकुंकू समारंभास प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव जिल्ह्याचे  माजी जिल्हा उपाध्यक्ष सौ . अर्चनाताई पाटील, त्याचबरोबर डॉ.सौ साक्षीताई मल्हार पाटील, नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेविका सुमनबाई ठाकूर, नगरसेविका मीनाक्षीताई काळे ,नगरसेविका राणीताई सुरवसे,  साक्षीताई बनसोडे,  छमाताई राठोड, नगरसेविका कमलताई कांबळे , कविताताई पुदाले आदीसह  बहुसंख्य महिला भगिनीं या समारंभात उपस्थित होत्या .

यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील यांनी नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचे कौतुक करुन विजेत्या महिलांचे अभिनंदन केले.  या कार्यक्रमासाठी नगरसेवक दत्तात्रय दासकर, .नगरसेवक शशीकांत पुदाले.. भाजपाचे माजी शहराध्यक्ष  धिमाजी घुगे, भाजपचे नेते सुशांत भूमकर, मुरमे ,आबा माने,भाजपाचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, अनिल पाटील, बलदेवसिंग ठाकूर,बंडाप्पा कसेकर, ज्योती बचाटे,संदीप गायकवाड,तसेच धरणे परिवारातील सर्व महिलासह अनेक नागरिक  उपस्थित होते. 
हळदी कुंकू समारंभानंतर होम मिनिस्टर या स्पर्धेतील पुढील विजेत्या  स्पर्धकांना  पारितोषिक देण्यात आले आहे. प्रथम क्रमांक  सौ.पूजा सुरवसे,  द्वितीय क्रमांक  सौ.अंकिता डुकरे, तृतीय  सौ. ज्योती सुरवसे, चौथा क्रमांक  सौ. प्रिती जाधव, पाचवी - सौ.स्नेहा कांबळे आदी  विजेत्या महिलांचा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
 
Top