ही लढाई नात्यातील नसून प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या स्वाभीमान राखण्यासठी- धनंजय सावंत; कार्यकर्ता आढावा बैठकीस उत्स्फूर्त  प्रतिसाद

परंडा, दि. २५ : शहाजी कोकाटे

माजी मंत्री आ.प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचे पुतने जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधात जि.प., पं.स. निवडणुकीत बंड पुकारले असून त्या अणुषंघाने दि. २४ रोजी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. 


याप्रसंगी जिल्हा प्रमुख धनंजय सावंत म्हणाले की, मी कार्यकर्त्यांची लढाई लढण्यासठी निवडणुकीच्या फडात बंड करून उतरलो आहे. मी कार्यकर्ता म्हणुन काम केले. अधीकार हा कामान व कर्तुत्वान मिळत असते. निववडणुक दरम्यान योग्य कार्यकर्त्याला न्याय मिळाळा पाहीजे, तो होत नाही. शिवसेना (शिंदे) पाक्षच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील काही ठरावीक पदाधीकारी यांनी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता केवळ आपले बगलबच्चे संभाळण्याचे केला. म्हणून हा मी उठाव केला आहे असे माजी जिल्हाप्रमुख धनंजय सावंत कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.
        
  सोनारी येथील धनंजय सावंत यांच्या निवासस्थानी आपले सहकारी, कार्यर्ते यांची मते समजुन घेण्यासाणि, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या यासाठीच मोठा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी धनंजय सावत पुढे म्हणाले की, आमदार तानाजी सावंत यांचे कान भरण्याचे काम त्यांच्या जवळच्या ठरावीक कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे निष्ठावंत, प्रामाणीक कार्यकर्त्यांवर अण्याय होत होता. काही दिवसा पूर्वी मी माझे काका आ. प्रा. सावंत यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालनार असल्याचे सांगून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा अणेक चुकीच्या गोष्टी माझ्या काकाच्या काणात कोणीतरी कुजबुजत असल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. आपली लढाई नात्यातील नाही. तर प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या स्वाभीमान राखण्यासाठी आहे. 
     
 या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी प्रा. गौतम लटके, धनंजय पाटील, दत्ता मोहीते यांनी आपले मणोगत व्यक्त केले. या मेळाव्यासाठी मतदार संघातून धनंजय सावंत यांचे समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top