जि.प. साठी ७१ तर पं.स. निवडणुकीसाठी ११६ उमेदवारी अर्ज; नामनिर्देशनपत्र छाननीमध्ये सर्व अर्ज मंजुर
प्रत्यक्ष निवडणुकीच्या फडातुन कोण माघार घेणार याकडे लक्ष; आघडी का स्वतंत्र २७ रोजी चित्र होणार स्पष्ट
परंडा, दि.२३: शहाजी कोकाटे
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाच गटासाठी ७१ उमेदवारांनी ९२ तर पंचायत समितिच्या १० गणासाठी ११६ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले होते. नामनिर्देशन छाननी मध्ये सर्वच अर्ज मंजूर झाले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात जि.प. गटामध्ये ७१ तर पं.स. गणामध्ये ११६ आता यामधुन किती उमेदवार माघार घेतात हे दि. २७ रोजी समजणार आहे.
परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद पाच गट व पंचायत समितीच्या १० गणातील निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या दि. २१ जानेवारी या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. यामध्ये जि.प. शेळगाव गट क्र. २९ मधुन १३, अनाळा गट क्र. ३० मधुन ११, जवळा (नि.) गट क्र. ३१ मधुन १९, डोंजा गट क्र. ३२ मधुन १४, तर लोणी गट क्र. ३३ मधुन १४ असे एकून ७१ उमेदवारी अर्ज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. तर पंचायत समिति चिंचपुर बु. गण क्र. ५७ मधून १७, शेळगाव गण क्र. ५८ मधुन ५, अनाळा गण क्र. ५९ मधुन ७, खासापूरी गण क्र. ६० मधुन ९, जवळा नि. गण क्र. ६१ मधुन १४, सिरसाव गण क्र. ६२ मधुन १३, डोंजा गण क्र. ६३ मधुन ११, सोनारी गण क्र. ६४ मधुन १२, वडणेर गण क्र. ६५ मधुन १६, तर लोणी गण क्र. ६६ मधुन १२ असे एकून ११६ उमेदवारी अर्ज पंचायत समिती निवउडणुकीसाठी आले आहेत.
आघडी का स्वतंत्र दि. २७ रोजी चित्र होणार स्पष्ट. ....
सध्या सुरू असलेल्या समुद्र मंथनाप्रमाणे राजकिय निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय मंथन सुरू असल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षात आणी इच्छुकांमध्ये चलबिचल अशी स्थिती दिसुन येत आहे. कधी कोण कुठे जाईल? याची कोणालाच शास्वती राहीलेली नाही. यात नेतेमंडळींना आपल्या पक्षाची कोणाबरोबर युती, आघाडी करायची? त्यासाठी कोणाचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे? अशा घडामोडीत कोण किती यशस्वी होते हे दि. २७ जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. आणी खरे निवडणुक आखाड्याचे चित्र त्याच दिवशी इच्छुक उमेदवारांसह मतदारांना समजनार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस हे नेतेमंडळी व पक्षश्रेष्ठीसाठी कसरतिचे दिसत आहेत.