छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यावरून महिलेवर समाजकंटकांकडून भ्याड हल्ला; नळदुर्ग शहर सकल मराठा समाजाच्या वतीने जाहिर निषेध , दोषीवर कठोर कारवाईची मागणी
नळदुर्ग, दि.२४:
बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यावरून मराठा भगिनी संजीवनी वाघ यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नळदुर्ग शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने
जाहीर निषेध करत दोर्षी समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यावरून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठा भगिनी संजीवनी वाघ यांना कपडे फाडून मारहाण करण्यात आली आहे, ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून याचा नळदुर्ग शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात अशा काळिमा फासणाऱ्या घटना होत असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, कारण छत्रपती शिरायांचा पुतळा बसविल्यावरून कांहीं समाज कंटकानी हा भ्याड. हल्ला केला आहे, त्यामुळे शिवरायांच्या नावावर जगणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ही घटना गांभीर्याने पाहिली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त करत आता आम्हाला रस्त्यावर उत्तरावे लागणार आहे, छत्रपतीच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत, आम्हाला शिवरायांनी महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे हातपाय कलम करण्याचा इतिहास दिला असल्याचे सांगून त्यांच्याच महाराष्ट्रात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करताना शिवरायांचा पुतळा उभा केला होता. त्या दरम्यान पुतळा बाजूला उभा करा म्हणून समाज कंटकानी महिलांवर भ्याड हल्ला करून महाराष्ट्र धर्माला कलंक लावला आहे, त्यामुळे यातील दोर्षीवर तात्काळ कारवाई करून कडक शासन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर संजय दशरथराव आधव , नगरसेवक तानाजी जाधव, गोपीनाथ विश्वनाथ माने, भगवंत रामराव सुखसे , युवराज जगताप, वैभव पाटील , शिवाजी सुरवसे,स्वप्नील काळे, आकाश काळे, गणेश मोरडे, संतोष रामचंद्र मुळे , संतोष किल्लेदार,अभय गुरन्धक्षेत्र किल्लेदार,रतिकांत नागणे, श्याम शिंदे ,संदिप गायकवाड ,नेताजी नामदेव मुळे, डॉ जितेंद्र पाटील, मोतीराम जाधव, महादेव जगताप , बालाजी अरुण किल्लेदार, संदिप संतोष गायकवाड, श्याम राजेंद्र बागल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.