नळदुर्ग: संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छ जल - स्वच्छ मन " अभियानांतर्गत मैलारपूर श्री खंडोबा मंदिर परिसर ,बोरी नदीची स्वच्छता 

नळदुर्ग,दि.२३:

प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियानांतर्गत नळदुर्ग येथिल मैलारपूरच्या खंडोबा मंदिर परिसर व बोरी नदीची स्वच्छता 
रविवार दि. 22 फेब्रुवारी रोजी जवळपास दोनशे जणांकडून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रामितजी महाराज यांच्या पावन सानिध्यात युमुना छट घाट आय टीओ दिल्ली येथे शुभारंभ केला.
या परियोजना अंतर्गत संत निरंकारी मिशन सोलापूर झोन मधील ब्रँच नळदुर्ग येथील खंडोबा बानाई विवाह स्थळ यांच्या  पदस्पर्शशाने पावन झालेले खंडोबा मंदिर व बोरी नदी परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिदार सुखीजा जी यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, "स्वच्छ जल स्वच्छ मन" या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेऊन ही परियोजना भारतातील जवळपास 1600 पेक्षा अधिक ठिकाणी 27 राज्ये व केंद्र शाशीत प्रदेशातील 900 शहरात एकाच वेळी राबविण्यात आली. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पबाबत जणसामान्यांना जागृत करून येणाऱ्या भावी पिढ्याचे भवितव्ये स्वस्थ करणे हा आहे.

रविवारी झालेल्या स्वच्छता अभियानात शाखा नळदुर्गचे सर्व सेवादल व अणदूर, जळकोट ,नंदगाव , लोहगाव  मुर्टा, किलज, जेवळी, ईटकळ आदीसह नगरपरिषदेचे कर्मचारी,
परिसरातील 60 सेवादल, माता बहेनजी 120 जणांनी यामध्ये सहभागी झाले होते.

  नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक इमाम शेख, नळदुर्गचे सुपुत्र उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी,  अँड धनंजय धरणे, अँड लखन इंगोले , यांच्यासह नगरपरिषदेचे  कर्मचाऱ्यांनी  आपले योगदान दिले.  यावेळी सुनिल पिस्के यांनी  सर्वाचे आभार मानले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top