नळदुर्ग : कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता १२ वी ची वार्षिक परीक्षा कॅमे-याच्या नगराणीखाली शांततेत सुरु 

नळदुर्ग,दि.१२ : 

शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता १२ वी ची वार्षिक लेखी परीक्षा दि.१० फेब्रुवारी रोजी पासुन सिसीटी व्हीप कॅमेरा व कडक पोलिस बंदोबस्तात शांततेत सुरु झाली आहे.शेवटचा पेपर दि.६ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी परिक्षा केंद्रास भेट दिली.

बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १२ वी च्या परिक्षेकरीता एकुण २६ कक्ष असुन याठिकाणी ६३४ परिक्षार्थी विद्यार्थी परिक्षा देत आहे. या परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षकासह एकूण ४०  कर्मचारी कार्यरत असून प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक प्रा.मोतीराम पवार कामकाज पाहत आहेत.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top