उन्हाळ्यात तहानलेल्याची तृष्णा भागविण्यासाठी "जार" च्या थंडगार पाण्याची पाणपोईचा शुभारंभ; 8फार्मा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम - नगराध्यक्ष बसवराज धरणे 

नळदुर्ग, दि.३०:

 पाणी म्हणजे जीवन असून, अशा या रखरखत्या उन्हात जनतेसाठी थंडगार जार चे पाणी देणे हा 8-फार्मा ग्रुपचा उपक्रम स्तुत्य असून अशा सामाजिक, उपक्रमाची समाजाला खूप गरज असल्याचे प्रतिपादन नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी केले.

नळदुर्ग शहरातील शिवतीर्थ काॅम्पलेक्स येथे संजीवन मेडिकल स्टोअर व  8-फार्मा ग्रुपच्या वतीने, युवक नेते सुनील चव्हाण यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित पाणपोई उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष बसवराज धरणे हे बोलत होते. यावेळी डॉ.जितेंद्र पाटील, पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव, नगरसेवक रिझवान काझी, अभियंता स्वप्नील काळे,  शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.


 याच कार्यक्रमात नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल आरोही सातपुते या विद्यार्थिनीचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगरसेवक सुधीर हजारे, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शहराध्यक्ष बबन चौधरी, पत्रकार उत्तम बणजगोळे, शिवाजी नाईक, दादा बनसोडे, अमर भाळे, उमेश जाधव, प्रमोद जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव, गोविंद शिंदे, अजय अणदूरकर, जीवन मोजगे, गुणवंत मुळे, राम जाधव आदीनी परिश्रम घेतले.
 
Top