सिद्धेश्वर (अण्णा) कोरे  यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व बांधकाम विभागामार्फत विकासाला नवी गती मिळेल- जि.प.अध्यक्षा अर्चनाताई  पाटील

धाराशिव,दि.३१:

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापतीपदी  सिद्धेश्वर (अण्णा) कोरे यांची झालेली निवड हा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आणि निष्ठेचा सन्मान करणारा असल्याचे गौरवोद्गार जि.प.अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी काढले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्चनाताई पाटील, मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदगाव जि.प.गटातुन महायुतीचे सिद्धेश्वर (अण्णा) कोरे हे दणदणीत विजय मिळविले. त्यांनतर त्यांची अर्थ व बांधकाम सभापतीपदी  निवड करण्यात आली. त्यांनी  आपल्या पदाचा पदभार नुकतेच जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील व  नेतेमंडळीसह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला. यावेळी त्यांना त्यांच्या दालनातील खुर्चीत बसवून सुशासन, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभारासाठी  शुभेच्छा दिल्या .

महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण  सोहळा पार पडला.

श्री. कोरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थ व बांधकाम विभागामार्फत विकासाला नवी गती मिळेल, जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि पारदर्शक कारभाराचा आदर्श निर्माण होईल, असा ठाम विश्वास अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त  केला आहे.

 
Top