तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव
तुळजापूर, दि.०८:
महिला केवळ घर सांभाळत नसुन देश घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या मध्ये आहे.त्यामुळे महिलांनी सक्षमपणे पुढे यायला पाहिजे व सर्व क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे असे मत माजी सरपंच प्रा.ज्योतीका चव्हाण यांनी केले
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्योतीका प्रकाश चव्हाण तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी प.स.सदस्या रेखा चव्हाण धानाबाई राठोड, राजश्री चव्हाण उपस्थित होत्या . यावेळी ते बोलत होत्या.
यावेळी फुलाबाई लक्ष्मण राठोड (सरपंच) रामतीर्थ शांताबाई राठोड ग्रा.प.सदस्य , कांताबाई पवार ग्रा.प.सदस्य जयश्री चव्हाण सी.आर.पी, सुरेखा चव्हाण हॅलो फाऊंडेशन प्रेरक,रेखा राठोड स्वयं शिक्षण प्रयोग संस्था, सविता राठोड सक्षम महिला बचत गट,वंदना चव्हाण ,गुणाबाई राठोड, शानुबाई चव्हाण, या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शांताबाई चव्हाण, सुनिता चव्हाण,मंगल चव्हाण, पार्वती चव्हाण, शांताबाई राठोड, सुनिता सुनिल चव्हाण,रिना चव्हाण, ज्योती चव्हाण, उपस्थित होत्या.यावेळी सुत्रसंचलन गणेश चव्हाण यांनी केले शेवटी राष्ट्रगानने सांगता करण्यात आली.