महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल बताले यांची निवड
नळदुर्ग,दि.०४:
क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव समिती नळदुर्ग २०२६ चे नूतन पदाधिका-यांच्या निवडी पार पडल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत पुढील प्रमाणे या निवडी करण्यात आल्या. यामध्ये अध्यक्षपदी राहुल बताले तर उपाध्यक्षपदी सोमेश्वर बटुले व सचिन कलशेट्टी, तर सचिवपदी संकेत स्वामी व संकेत खद्दे, सहसचिवपदी वीरेंद्र बेडगे व दर्शन मुळे तर कोषाध्यक्षपदी शशांक खानमाडे व अर्जुन गोगावे, मिरवणूक प्रमुख मयूर बचाटे, अक्षय बताले, राहुल कलशेट्टी, अभिषेक व्हनाळे, धिरज शंकरशेट्टी, संकेत कसेकर, सोमनाथ रेड्डी, अमर कलशेट्टी, रोहित कलशेट्टी, दर्शन मुळे, श्रीनिवास मुळे, सागर मुळे आदिंची निवड करण्यात आली.