पंडित दिनदयाळ उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियान उत्साहात

 धाराशिव दि.४ :

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची निर्मिती व्हावी या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ चे आयोजन संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटीलमाजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडत आहेत.

धाराशिव जिल्यातील संघटनात्मक १९ मंडळा पैकी १२ मंडळांमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले .या प्रशिक्षण वर्गास १२ मंडळातून सुमारे १६८० हून अधिक जेष्ठयुवामहिला भगिनी प्रशिक्षित झाल्या आहेत.

          

  या वर्गांमध्ये वैचारिक अधिष्ठानभारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि विस्तारपक्ष संघटन विस्ताराची दृष्टीपक्षाची कार्यपद्धतीआपल्या सरकारची कामगिरीसोशल मीडिया आणि AI तसेच नमो ॲप आणि सरल ॲपबूथ व्यवस्थापनमन की बात या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण महा अभियाना मध्ये 19 मंडळापैकी 12 मंडळामध्ये शिबिरांचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून उर्वरित मंडलांमधील वर्गांचे पण लवकरच पूर्ण होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले.

 
Top