परीवर्तनचे मारुती बनसोडे यांना अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर 

नळदुर्ग,दि.२२:

 परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त मारुती बनसोडे यांना यावर्षीचा अंबरनाथ टाईम्स कडून दिला जाणारा अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
मारुती बनसोडे हे मूळचे बोरगाव ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत गेली ३८ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करीत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या समवेत १० वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर परिवर्तन संस्थेची स्थापना १९९६ मध्ये केली.  पोतराज प्रथा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, पाणी, ग्रामविकास, विधवा, निराधार,परित्यक्ता, एकल महिलांच्या प्रश्नावरही ते काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 


  अंबरनाथ गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार 23 मे 2019 रोजी अंबरनाथ येथे एका  कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
 
Top