ठेकेदाराचे टेंडर रद्द करून कारवाईसाठी काँग्रेस नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे धाव ; नळदुर्ग शहरातील घनकचरा प्रकरण
नळदुर्ग,दि.१२:
शहरातील घनकचरा संकलन कामातील गंभीर अनियमितता व कामगारांच्या सुरक्षेबाबत लक्ष देत नसल्याचे आरोप करत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असुन सदर ठेकेदाराचे टेंडर रद्द करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
दि. ११ मे २०२६ रोजी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नळदुर्ग नगर परिषद हद्दीत घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गंभीर स्वरूपाच्या अनियमितता होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून
निवेदनानुसार संबंधित ठेकेदार कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार आवश्यक असलेले सुरक्षा साहित्य कामगारांना देण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शहरातील स्वच्छता कामात निष्काळजीपणा होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
▶️निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख तक्रारी पुढीलप्रमाणे आहेत
स्वच्छता कामगारांना आवश्यक असलेले सेफ्टी शूज देण्यात आलेले नाहीत.
कामगारांना रेनकोट व युनिफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.
हातमोजे (Gloves) व इतर सुरक्षा साहित्य देण्यात आलेले नाही आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ अपुरे असल्याने शहरातील स्वच्छता कामांवर परिणाम होत आहे.
कामगारांची हजेरी नोंद व वेतन नोंदी व्यवस्थित ठेवण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे . तसेच.ठेकेदार कंपनीकडून कंत्राटातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यासर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्था तातडीने सुधारावी अशी मागणी करण्यात आली आहे.डम्पिंग ग्राउंड येथे कचरा उघड्यावर टाकला जात आसुन प्लास्टिकचे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण प्रदुषणात वाढ होत आहे. सदर टेंडर रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगरपालिकेतील विरोधी गटनेते मारुती खारवे, नगरसेवक आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, झुलेखाबेगम इनामदार, मदिना बागवान, कमलबाई गायकवाड, मन्नाबी कुरेशी, नसीर इनामदार, सईद बागवान, रवी गायकवाड, लखन भोसले, यांच्या सह्या आहेत.