रवी महाराज राठोड यांची राष्ट्रीय गोर बंजारा एकता विचार एसोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी व राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने  सत्कार 

नळदुर्ग दि. १३:

राष्ट्रीय गोर बंजारा एकता विचार एसोसिएशन संघटनेच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी  व नळदुर्ग शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री.रवि महाराज राठोड यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

नळदुर्ग (वसंतनगर) शहरातील रवि महाराज राठोड यांची गोर बंजारा एकता विचार एसोसिएशन संघटनेच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्याचबरोबर नळदुर्ग शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  मंगळवार दि.12 मे रोजी बालाघाट कॉम्प्लेक्स् याठिकाणी त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने शाल, पुष्पहार घालुन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, पत्रकार शिवाजी नाईक, संजय जाधव, गणेश राठोड, तानाजी बंडगर, महेश राठोड, किरण राठोड आदिजण उपस्थित होते.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top