नळदुर्ग: नागरिकांच्या  समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागातर्फे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व" शिबीराचे शुक्रवारी आयोजन

नळदुर्ग,दि.१४: 

नागरिकांच्या प्रशासकीय  पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने शुक्रवार दि. 15  मे   रोजी नळदुर्ग शहरातील बी.के फंक्शन हॉल याठिकाणी महसूल विभागातर्फे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व" शिबिराचे आयोजन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील जनतेचे महसूलविषयक प्रश्न व तक्रारी तत्काळ निकाली काढणे हा आहे. हे शिबिर  मंडळ स्तरावर नळदुर्ग याठिकाणी सकाळी 10 वाजता होणार आहे.

यामध्ये सातबारा दुरुस्ती, वारस नोंदी, आणि दाखले यांसारख्या सेवा 'सिंगल डे' (एकाच दिवसात) तत्त्वावर पुरवल्या जातात.मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ:उद्देश: महसूल प्रशासन लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करणे.सेवा: सातबारा दुरुस्ती, ई-फेरफार, वारस नोंदी, महिलांच्या नावांची नोंद, रेशनकार्ड दुरुस्ती, आणि विविध दाखले (उत्पन्न, रहिवासी) जागेवर मिळतात.या शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी धाराशिव  ओंकार देशमुख  तुळजापूर तहसीलदार  अरविंद बोळगे  अप्पर तहसीलदार  प्रमोद गायकवाड , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच , सदस्य ,पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक, तलाठी,  आदी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top