संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य विलास राठोड यांचा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्काराने थाटात गौरव
जळकोट ,दि.२२:
संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य विलास राठोड यांचा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
आलियाबाद येथील विलास राठोड यांनी शासन व प्रशासन यांच्याशी योग्य समन्वय ठेवून राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल शिर्डी (जि. अहिल्यानगर ) येथील बी दि चेंज फाउंडेशनने एका खास समारंभात समाज परिवर्तनाच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल
विलास राठोड यांनी आलियाबाद या छोट्याशा तांड्यातून राजकीय व सामाजिक कार्याला सुरुवात करून हळूहळू जनतेची सेवा करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विलास राठोड यांनी दहा वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न मांडले आहेत. त्यांना आलियाबाद ग्रामपंचायत सदस्य पदावर प्रथम काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी थेट ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लढवली आहे. परंतु अवघ्या थोड्या मतानी ते विजयापासून दूर राहिले. विलास राठोड यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपाचे सामाजिक व राजकीय कार्य करत आहेत.
पहिल्यांदा पक्षात भाजपा जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदावर त्यांनी जिल्ह्यात संपर्क वाढवून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. विलास राठोड सध्या तुळजापूर तालुका महामंत्री पदावर कार्यरत होते,त्यांना पक्षांनी दुर्लक्षित अशा संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना धाराशिव जिल्हाधिकारी समितीवर अशासकीय सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली आहे. ते या पदाला सध्या न्याय देत आहेत. संभाजीनगर येथील दिलासा या संस्थेवर विभागीय समन्वयक या पदावरील संस्थेच्या माध्यमातून जवळ जवळ २०० गावात सर्वसामान्य जनतेला विविध योजनेचा लाभ दिला आहे. त्यांच्या पत्नी सौ. रंजना राठोड ह्या नळदुर्ग ग्रामीण मंडळ भाजपाच्या अध्यक्ष आहेत. प्रत्येक समाजाच्या उत्सवामध्ये विलास राठोड सक्रिय सहभागी होतात. समाजाच्या विविध प्रश्नासाठी प्रसंगी आक्रमक लढा उभारून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सध्या ते राजकीय प्रवास करत आहेत.
विलास राठोड यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल शिर्डी येथे दि.१७ मे २६ रोजी एका खास कार्यक्रमात विलास राठोड यांना सैनिक दलाचे माजी सुभेदार श्री. अरुण भंडारे (आरटीडी), अभिनेत्री निवेदिता पगार, यांच्या हस्ते राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी आर्टिस्ट शुभांगी थोरात, बी दि चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर लोकचावले, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, राज्यातून २५० पुरस्कार विजेते उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल धाराशिव जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.