अधिकमास महिन्या निमित्त नळदुर्ग मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन

नळदुर्ग,दि.२४ :

हिंदू धर्मामध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या अधिकमास महिन्यात धार्मिक कार्याला खुप महत्व आहे.. या पवित्र महिन्याच्या निमित्ताने नळदुर्ग येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त वन अधिकारी विनय परळकर व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर सुप्रियाताई परळकर यांनी आपल्या निवासस्थानी भागवत सप्ताहचे सोमवार दि.२५ ते ३१ मे या कालावधीत 
आयोजन केले आहे.



यावेळी वेद शास्त्र संपन्न वेणु गोपाळाचार्य काशीकर यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सांगितली जाणार आहे.. रोज सकाळी 8 ते 12 या वेळेत संस्कृतमधून संहितावाचन आणि रोज दुपारी 4 ते 6 मराठीतून अर्थानुवाद सांगितला जाईल.

31 मे रोजी भागवत सप्ताहाची समाप्ती होईल..
जगताप नगर नळदुर्ग येथे आयोजित भागवत सप्ताहच्या  सर्व कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे..
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top