"एकच धून सहा जून, चलो रायगड! चलो रायगड!," शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीने शिवप्रेमींना आवाहन


विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळया निमीत्ताने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी ०६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येणार आहे. लोकोत्सव सार्वभौम स्वराज्याचा या अनुषंगाने खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
      

शुक्रवार दिनांक ०५ जून २०२६ रोजी युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या वतीने जिजाऊ समाधी स्थळ पाचाड समाधीस अभिवादन करून नाणे दरवाज्यातून गड चढण्यास प्रारंभ, नगारखाना येथे गडपुजन, होळीचा माळ येथे युवराज्ञी संयोगीता राजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते धार तलवारीची युध्दकला महाराष्ट्राची युध्दकला प्रात्यक्षिके, होळीचा माळ येथे ढोल वादन लेझीम प्रात्यक्षिके, वारकरी सांप्रदाया कडून टाळ मृदुंगाचा गजर, राजसदरेवर जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा, जगदिश्वर मंदिर येथे वारकरी सांप्रादाया कडून किर्तन व भजन.
          

शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी सकाळी ठिक ०७:०० वा. नगारखाना येथे युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते ध्वजपुजन व ध्वजारोहन, राजसदरेवर शाहीरी पोवाडा कार्यक्रम, श्री. शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते श्री. शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मुर्तीस अभिषेक व राजसदरेवरील सिंहासनारूढ मुर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक, युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन, सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक पालखी सोहळयास प्रारंभ, पालखीचे जगदिश्वर मंदिर येथे आगमन, वारकरी सांप्रदायास जगदिश्वर मंदिर येथे पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करणे, श्री. शिवछत्रपती महाराजांच्या समाधिस अभिवादन.
        

  भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन ०६ जून रोजी शिवभूमी दुर्गराज रायगडावर साजरा होणाऱ्या या अभूतपुर्व सोहळ्यास धाराशिवकर जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहून या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगीता राजे छत्रपती महाराज तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड, महाराष्ट्र राज्य आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती, धाराशिव यांच्या वतीने करण्यात येत आहे.


 
Top