माजी नगरसेवक संजय अण्णाप्पा बताले यांची अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड 

नळदुर्ग,दि.०३:

येथिल माजी नगरसेवक संजय अण्णाप्पा बताले यांची अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.बताले यांना दि.३१ मे रोजी  संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. या निवडीबद्दल बताले यांचे सर्वत्र अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.
  "शिवा" संघटनेच्या माध्यमातुन होणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रबोधन, महत्वाच्या व उदात्त कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येत असुन धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावात जावुन वीरशैव लिंगायत समाज बांधवांना संघटीत करण्याचे  कार्य करुन "शिवा" संघटना वाढविण्यासठी  सर्वतोपरी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संजय बताले यांची निवड झाल्याबद्दल शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे , राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, राज्याचे सरचिटणीस धनुकुमार शिवणकर, नागेश चौगुले,निलय्या स्वामी, संतोष वाले, संगमेश्वर व्हनाळें, राजेंद्र तोगे, अविनाश पाटील, आदीसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



 
Top