लिंगायत समाजाच्या  विकासासाठी युवकांनी "शिवा" संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन - नुतन जिल्हा अध्यक्ष संजय बताले  

नळदुर्ग, दि. ४ जून 

भविष्यात  प्रत्येक गावात शिवा संघटनेची शाखा स्थापन करणे, समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवणे व नळदुर्ग शहरातील 
बसवसृष्टीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगुन समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी व लिंगायत समाजाच्या विकासासाठी शिवा" संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे नूतन धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय बताले यांनी नळदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले 

शिवा संघटनेची धाराशिव, तुळजापूर, लोहारा व उमरगा याठिकाणीची  कार्यकारिणी बरखास्त करून  नळदुर्गचे माजी नगरसेवक  संजय बताले यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. याचवेळी सतीश पाटील (हिप्परगा ताड) यांची जिल्हा उपाध्यक्ष, रविराज मुळे (अणदूर) यांची तुळजापूर तालुका अध्यक्ष आणि प्रशांत बोधणे (सलगरा दिवटी) यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 नळदुर्ग येथे  मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय बताले पुढे म्हणाले की, शिवा संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसून समाजहितासाठी कार्य करणारी संघटना आहे. लिंगायत समाजाच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या  माध्यमातून कार्यरत राहणार आहे.

 धाराशिव जिल्ह्यातील गावा-गावांत संघटनेच्या शाखा स्थापन करून युवकांना संघटित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीचा समस्या सोडविण्यात येणार आहे.
 अनेक गावांमध्ये समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याचे सांगत प्रत्येक गावात लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे बताले यांनी सांगुन नळदुर्ग शहरातील कांहीं वर्षांपासून रखडलेल्या बसवसृष्टी प्रकल्पांबाबत  पाठपुरावा करून  बसवसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे.


या पत्रकार परिषदेला संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, राज्य सरचिटणीस धनुकुमार शिवणकर, नागेश चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील, तालुका अध्यक्ष रविराज मुळे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बोधणे, आप्पासाहेब पाटील , आण्णासाहेब आलुरे,निलय्या स्वामी, संतोष वाले,सुभाष कोळी, गणेश मुळे, संगमेश्वर व्हनाळे, अविनाश पारील,युवराज साखरे, अनिल मुळे, बसवेश्वर  पाटील, सुजीत बिराजार,किशोर गोवे, संतोष बताले, परमेश्वर गबुरे, सुशांत राजमाने, सोनु वाले, सोमनाथ बताले अँड समन, अँड आनंद बताले , राहुल बताले,  महेश बताले आदीसह नळदुर्ग, अणदुर, नंदगांव ,दहिटणासह  जिल्ह्यातील  कार्यकर्ते उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top