आलिया बाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्याची गुढी उभारून अभिवादन

जळकोट, दि.०६ जुन

आलियाबाद ता.तुळजापूर येथे  रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्याची गुढी उभारून अभिवादन केले.

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयात सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, माजी उपसरपंच सुभाष नाईक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते माणिक राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड, मोतीराम राठोड, रेवाप्पा राठोड,किरण चव्हाण, शिवाजी चव्हाण, संदीप राठोड यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top