बंजारा विरासत"  संघाच्या नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचे  प्रशासकीय सल्लागार मोहन राठोड यांचे नळदुर्ग येथे आवाहन 

नळदुर्ग,दि.०७ :

"बंजारा विरासत"  संघाच्या माध्यमातून 
बंजारा समाजाच्या विविध समस्या, अडचणी सोडवून समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.त्याकरिता नोंदणी मोहिमेत सहभागी होवुन आपल्या तांड्याची, गावाची आणि कुटुंबाची माहिती नोंदविण्याचे आवाहन  निवृत्त संचालक, माहिती व जनसंपर्क प्रशासकीय सल्लागार मोहन राठोड यांनी नळदुर्ग येथे शनिवारी केली.

बंजारा बंधुभाव आणि एकतेला अधिक बळ देण्यासाठी  "बंजारा विरासत  संघ" ही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.  संजय राठोड यांच्या संकल्पनेतून या  उपक्रमाची निर्मिती झाली आहे.
बंजारा समाजाचे  प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी  ना . संजय राठोड   यांचे प्रशासकीय 
 सल्लगार मोहन राठोड , स्वीय सहाय्यक  संकेत चव्हाण ( मुंबई ) ,अँड.तुषार विधाते (मुंबई हायकोर्ट) आदींनी  शनिवार, दि. 06 जुन रोजी नळदुर्ग येथील वसंतनगर याठिकाणी संत सेवालाल महाराज मंदिर  सभामंडपात आयोजित कार्यक्रमात बंजारा समाज बांधवासमवेत चर्चा केली.

"बंजारा विरासत  संघ" या माध्यमातून समाजाच्या अस्तित्वाची आणि सामर्थ्याची अधिकृत नोंद करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. या माध्यमातून प्रत्येक बंजारा कुटुंब, प्रत्येक तांडा, प्रत्येक गाव आणि प्रत्येक जिल्ह्याची माहिती एकत्रित केली जात आहे.
पुढील पिढ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी, आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी सक्षमपणे आवाज उठवण्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे. त्याकरिता "बंजारा विरासत" संघाच्या नोंदणी मोहिमेत सहभागी व्हा.  आपल्या तांड्याची, गावाची आणि कुटुंबाची माहिती नोंदविण्याचे त्यानी आवाहन केले.



या कार्यक्रमास  नगरसेविका  छमाबाई राठोड , संयोजक  जगदीश राठोड ,फुलचंद नाईक, विनायक कारभारी, रवी महाराज राठोड , रामा राठोड ,राहुल जाधव, कनीराम राठोड ,भानुदास राठोड, विनोद जाधव, काशिनाथ राठोड, संजय जाधव, गणेश दिलीप राठोड,  बाबू राठोड,  शिवाजी चव्हाण, मिथुन राठोड, किरण राठोड, योगेश जाधव, राम नाईक, अविनाश बंजारे, सोनु राठोड, प्रदीप पवार, रोहित राठोड , रवि राठोड , सचिन राठोड, दगडू जाधव आदींसह  महिला, पुरुष, युवक बंजारा समाज बंधव उपस्थित होते. यावेळी सर्वांचे रवी महाराज राठोड यांनी आभार मानले.


 
Top