नळदुर्ग शहरात अहंकारी वाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न
नळदुर्ग,दि.०६ जुन
शहरातील माजी नगरसेवक , शिवभक्त विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळाअसंख्य शिवप्रेमीच्या उपस्थितीत शनिवार दि.०६ जुन रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
माजी नगरसेवक विनायक अहंकारी हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात. या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धअभिषेक करण्यात आले. यावेळी विनायक अहंकारी यांनी सुंदर सजावट केली होती.
याप्रसंगी नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक आकाश कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष नितीन कासार, पत्रकार विलास येडगे, माजी नगरसेवक शरद बागल,सरदारसिंह ठाकूर, सुशांत भूमकर,ज्ञानेश्वर घोडके, बलदेवसिंह ठाकूर,नंदकुमार जोशी, मुकुंद भूमकर, श्रमिक पोतदार,सागर हजारे, उत्तम बनसगोळे , किशोर जोशी,समीर मोरे, बालाजी कुलकर्णी, मारुती घोडके, पप्पू पाटील, राजेंद्र महाबोले, संतोष वाले, उमेश जाधव, अनिल पाटील, नारायण दोपारे, आदी शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाऊ यशस्वीतेसाठी विनायक अहंकारी, उमेश नाईक, प्रमोद कुलकर्णी, संतोष नाईक, प्रदीप ग्रामोपाध्ये,संदीप वैद्य, राजकुमार वैद्य,अजय देशपांडे,सन्नी भूमकर, सदानंद नाईक, नंदकुमार पोतदार, निधी नाईक, मयूर जोशी आदीनी पुढाकार घेतला .
यावेळी विनायक अहंकारी यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्व सांगितले. शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे त्यांनी मागणी केले आहे.