कर्तव्यदक्ष, दूरदृष्टीचे नेतृत्व : अशोकभाऊ जगदाळे
— सुधीर पोतदार
समाजात काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटल्यामुळे त्यांना लोकमान्यता मिळते. जनतेच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी होत लोकसेवेला जीवनाचे ध्येय मानणारे आणि विकासाची स्पष्ट दृष्टी बाळगणारे नेतृत्व म्हणजे अशोकभाऊ जगदाळे.
अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत अशोकभाऊंनी सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून अनेक कुटुंबांचा आर्थिक भार हलका करणे, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे, या त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकीची प्रचीती येते.
अशोकभाऊंच्या नेतृत्वावर जनतेने वेळोवेळी विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग नगरपरिषद, तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांसारख्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. हे त्यांच्या संघटन कौशल्याचे, कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे आणि जनतेच्या विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे.
साधेपणा, कार्यकर्त्यांशी आत्मीय संवाद, सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता आणि समाजहिताची प्रामाणिक तळमळ या गुणांमुळे अशोकभाऊ आज लोकनेते म्हणून ओळखले जातात. विकासाभिमुख विचार, लोकाभिमुख निर्णय आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे कार्य अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
समाजकारणात निष्ठा, विकासात सातत्य आणि जनतेशी जपलेले विश्वासाचे नाते हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे. आगामी काळातही त्यांच्या हातून समाजहिताची अशीच व्यापक सेवा घडत राहो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जावो, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
अशोकभाऊ जगदाळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
सुधीर पोतदार
पत्रकार/ न.प.सदस्य,
नगरपरिषद नळदुर्ग