तुळजापूर तालुक्यातील शिक्षकांची केंद्र प्रमुखपदी नियुक्ती; अनेकांना नव्या समूह साधन केंद्रांची जबाबदारी

नळदुर्ग, दि. २७ जून :

 जिल्हा परिषद, धाराशिवच्या शिक्षण विभागाने विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-२०२५ मधून निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदावरील नियुक्तीचे आदेश जाहीर केले आहेत.
 या आदेशानुसार तुळजापूर तालुक्यातील अनेक शिक्षकांना विविध केंद्रांवर केंद्र प्रमुख म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील नियुक्त्या पुढीलप्रमाणे :
बालाजी बळीराम क्षीरसागर – जि.प. प्राथमिक शाळा मोर्डा (ता. तुळजापूर) येथून  येडशी (ता. धाराशिव) केंद्रावर नियुक्ती,
अविनाश शंकरराव राठोड – जि.प. प्राथमिक शाळा वसंतनगर येथुन   नळदुर्ग   केंद्रावर नियुक्ती.,धनराज मल्लिनाथ कुडकळे – जि.प. प्राथमिक शाळा  जवळकोट (ता. तुळजापूर) येथून आष्टा (ता. लोहारा) केंद्रावर नियुक्ती,दीप्ती विश्वास खाडकीकर – जि.प. प्राथमिक शाळा सांगवी मार्डी (ता. तुळजापूर) येथून काटी (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती, इरशाद पापामिया शेख – जि.प. प्राथमिक शाळा कुंभारी (ता. तुळजापूर) येथून कानगरा (ता. धाराशिव) केंद्रावर नियुक्ती, भरत जनार्दन माने – जि.प. प्राथमिक शाळा  वाणेवाडी (ता. तुळजापूर) येथून अपसिंगा (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती, सिमा रमेश दूधगी – जि.प. प्राथमिक शाळा केशेगाव (ता. तुळजापूर) येथून अणदूर (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती, संतोष विलासराव पाटील – सावंतवाडी क्र. १ (ता. तुळजापूर) येथून सरोळा (बु.) (ता. धाराशिव) केंद्रावर नियुक्ती, शांताराम विष्णू कुंभार – जि.प. प्राथमिक शाळा चव्हाणवाडी (ता. तुळजापूर) येथून होर्टी (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती.
भूषण रामा थानंबीरे – जि.प. प्राथमिक शाळा आरळी (ता. तुळजापूर) येथून  शहापूर (ता. तुळजापूर) केंद्रावर नियुक्ती.
या नियुक्त्यांमुळे तुळजापूर तालुक्यातील समूह साधन केंद्रांचे कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या केंद्र प्रमुखांकडे शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षक मार्गदर्शन, विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन आणि देखरेखीची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
 
Top