आम्मा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव

कै. यमुनाबाई अहंकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

नळदुर्ग, दि. २० जुन 


येथील माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या मातोश्री कै. यमुनाबाई रंगराव अहंकारी यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘आम्मा पुरस्कार सोहळा’गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा पार पडला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूरचे उपनगराध्यक्ष रामचंद्र आबा रोचकरी, तुळजाभवानी मंदिर प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल भाऊ रोचकरी, दिशा नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. दिग्गज दापके देशमुख, नगरसेवक दत्तात्रय दासकर, माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी, मुश्ताक कुरेशी, नगरसेवक तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, प्रवीण गायकवाड, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसगोळे, शिवसेनेचे सरदारसिंह ठाकूर, संतोष पुदाले, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले, ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष मुकुंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते अजहर जागिरदार, भाजपाचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागने, पत्रकार लतिफ शेख, भगवंत सुरवसे, भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे, भाजपाचे श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, ज्येष्ठ नागरिक बाबुराव वैद्य, बाळासाहेब कुलकर्णी, तानाजी जाधव गुरुजी, नेताजी गव्हाणे गुरुजी, सुभाष महाबोले गुरुजी, पांडुरंग कुलकर्णी, उत्तम रामदासी, वसंत रामदासी, सुधीर पुराणिक, सुनील किलजकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, नंदकुमार जोशी, किशोर जोशी, अरुण जोशी, मुकुंद भूमकर, कल्याण कुलकर्णी, सुहास पुराणिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. यमुनाबाई अहंकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी धाराशिव येथील सुप्रसिद्ध अंकुर शिशुगृह या निराधार व लहान मुलांच्या संगोपनासाठी कार्यरत संस्थेला आम्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने दिशा नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. दिग्गज दापके देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच अणदूर येथील सेवानिवृत्त शिक्षक भगीरथ कुलकर्णी यांनाही आम्मा पुरस्काराने गौरविण्यात आले.

याच कार्यक्रमात दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात विशाल रोचकरी, डॉ. दिग्गज दापके देशमुख, शहाबाज काझी, मुकुंद नाईक आणि संतोष पुदाले यांनी मनोगत व्यक्त करत आम्मा पुरस्काराच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी आम्मा पुरस्कार सोहळ्याचे तसेच माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप ग्रामोपाध्ये, संतोष नाईक, संदीप वैद्य, राजू वैद्य, नंदू पोतदार, अजित भूमकर, सौरभ रामदासी, निधी नाईक, सदानंद नाईक, उमेश जाधव, विलास पाटील, विनोद जाधव, सुदर्शन पुराणिक, प्रमोद कुलकर्णी, हलीम पटेल, आबेद ईमानदार, मनोज कुलकर्णी, भावेश जाधव आणि ओंकार महाबोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ :

नळदुर्ग येथे आयोजित आम्मा पुरस्कार सोहळ्यात अंकुर शिशुगृह संस्थेला व सेवानिवृत्त शिक्षक भगीरथ कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top