राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ काळे यांचा सत्कार

तुळजापूर,दि.१२:

   पंचायत समिती तुळजापूर येथील गटशिक्षण कार्यालयात गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल मल्लिनाथ काळे यांचा राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीने राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य करताना तसेच त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे तुळजापूर तालुक्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्रशासनाने त्यांची गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती केली. या पदोन्नतीबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा प्रतिमा, पुष्पहार आणि बुके देऊन गौरव करण्यात आला तसेच पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार सोहळ्यास राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने, प्रदेश उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राज्य नेते सतीश हुंडेकरी, युवा स्पंदन संस्थापक तथा हेडगेवार रक्तपेढीचे संचालक  महेंद्र कावरे, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर हुंडेकरी, जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल म्हेत्रे, जिल्हा सरचिटणीस  दीपक हजारे, विष्णू दळवी, ज्योतिर्लिंग क्षीरसागर, अशोक चव्हाण, विशाल जाधव, तालुका अध्यक्ष  शरद सोनटक्के, विजय भालेकर, शेखु जेटीथोर, प्रमोद चौधरी, ज्ञानेश्वर घोडके, राजेंद्र हजारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुखदेव भालेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शरद सोनटक्के यांनी मानले.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top