मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आ. बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मानले आभार; सहकुटुंब उपस्थिती

मुरुम,दि.२४: डॉ सुधीर पंचगल्ले 

धाराशिव, बीड व लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य बसवराज पाटील यांनी मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

 यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणुकीतील यशानंतर प्रथमच झालेल्या या भेटीत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार बसवराज पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा मुरुमचे नगराध्यक्ष बापुराव पाटील , सचिन गुदगे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना उमरगा-लोहारा तालुका सहअध्यक्ष शरण पाटील, सौ. संपदा शरण पाटील, स्मिता पाटील तसेच पाटील कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, या सदिच्छा भेटीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top