ग्रामीण विद्यार्थिनींना १०० टक्के सवलतीच्या एस.टी. पासचे वाटप

नळदुर्ग, दि. २४ जून :

येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थिनी योजनेअंतर्गत त्रैमासिक १०० टक्के सवलतीच्या एस.टी. प्रवास पासचे वितरण उत्साहात करण्यात आले. वाहतूक नियंत्रक महेश डुकरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पासचे वाटप करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी महेश डुकरे यांचा शाल व पुष्पहार देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा आणि आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक धनंजय पाटील, उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, डॉ. एन. बी. जाधव, डॉ. दिपक जगदाळे, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. अतिश तिडके, प्रा. एच. व्ही. पाटील, प्रा. के. पी. भोसले, प्रा. के. एम. काळे, डॉ. बी. एस. सावते, प्रा. पी. के. पिरजादे, डॉ. जयश्री घोडके, प्रा. झरीना पठाण, प्रा. कल्पना जाधव, प्रा. उषा बदने, प्रा. जी. डी. बेले, विजय सुरवसे, शाम पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार असून शासनाच्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.
 
Top