श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय, तलमोड येथे प्रवेशोत्सव साजरा

उमरगा,दि.१५ : लक्ष्मण पवार 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी दि. १६ जून २०२६ रोजी श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय तलमोड येथे नवीन प्रवेशीत 8 वी  विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विराज मोरे गुरूजी यांची उपस्थिती होती. 

यावेळी सहशिक्षक सूर्यवंशी एम.आर., जाधव जे. जी. वडदरे एन.टी., बिराजदार ए. एस. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुरूवातीला विद्येची देवता सरस्वती  यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top