रांगोळी, तोरण आणि गुलाबपुष्पही अनोख्या स्वागताने चिमुकलेही अचंबित
नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते चिमुकल्यांचे स्वागत
उमरगा,दि.१५: लक्ष्मण पवार
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळा बालाजी नगर उमरगा येथील इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी चिमुकल्यांचे मन प्रसन्न करणारे तोरण.... पुष्पगुच्छ देऊन उमरगा उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता मोरे उपनगराध्यक्ष विजय वाघमारे शिक्षण सभापती शफी चौधरी नगरसेवक पंढरीनाथ कोणे. नायब तहसीलदार गजानन पारसकर, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, उपाध्यक्ष निजाम शेख उपस्थित होते. अतिशय उत्साहाने संचारलेल्या अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्याचे पहिल्या दिवशी शाळेत स्वागत करण्यात आले. दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारी शाळा सुरू झाल्या.
नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळांनी रांगोळी काढून आंब्याच्या झाडाच्या पानांची तोरणे बांधून विद्यार्थ्यांची शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करण्याचे आदेश वरिष्ठा कडून काढण्यात आले होते .त्यानुसार या अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण ही करण्यात आले. बहुतेक ठिकाणी पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. सुट्टीत ताजेतवाने झालेल्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच लगबग होती.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांचे स्वागत पाहून एखाद्या मोठ्या समारंभाप्रमाणे वाटत होते चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. चार चाकी वाहनातून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सदानंद सुत्रावे बशीर शेख सदानंद कुंभार संजय रूपाजी धनराज तेलंग नागेश स्वामी प्रवीण शिंदे वर्षाराणी पाटील सोनाली मुसळे वनमाला वाले सुनिता राठोड इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख भाग्यश्री पंडित, प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे व आभार सोनाली मुसळे यांनी मानले.