नळदुर्ग शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जर्दा साठ्यावर धाड;  ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

नळदुर्ग, दि. १० जून २०२६: 

अन्न व औषध प्रशासन विभागाने नळदुर्ग शहरात  प्रतिबंधित  सुगंधित तंबाखू जर्दा साठ्यावर धाड टाकुन ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर एका विरुद्ध  पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार रोजी करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, इस्माईल जबीउल्ला खुदरतुल्ला काझी यांच्याकडे विक्रीसाठी प्रतिबंधित तंबाखूजन्य जर्दा याची साठवणूक करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन   संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात  दि. ०९ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम  कलम ५९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी  पी. डी. इंबडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोदकुमार काकडे (धाराशिव) व सह-आयुक्त एस. आर. कारकाळे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top