नळदुर्ग येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

नळदुर्ग, दि. १७ : 

राजपूत समाज संघटनेच्या वतीने हिंदू कुलसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मंगळवारी नळदुर्ग येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 यानिमित्त माऊली नगर येथे आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच नगरपालिका कार्यालयातही जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
माऊली नगर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार विलास येडगे, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार आणि होर्टी येथील भाजपचे महादेव पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, उत्तम बनजगोळे, शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, राजपूत समाज संघटनेचे शहराध्यक्ष सुधीरसिंह हजारी, युवक शहराध्यक्ष मनीषसिंह हजारी, सागरसिंह हजारी, सरदारसिंग ठाकुर, राहुल हजारी, संदीप हजारी, अतुल हजारी, अजित हजारी, महेश हजारी, शुभम हजारी, सुरज हजारी व प्रेम हजारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, नळदुर्ग नगरपालिका कार्यालयातही महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी नगरपालिका कर्मचारी ज्योती बचाटे, शहाजी येडगे, फुलचंद सुरवसे, बाबा डुकरे तसेच राजपूत समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जयंतीनिमित्त महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम व राष्ट्रनिष्ठेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top