राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत नळदुर्ग शहरात उल्लेखनीय कामगिरी; २ हजार ४१ बालकांना पोलिओ लसीचे डोस; ९५ टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण
नळदुर्ग, दि. २९ जून :
नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत शहरातील १८ बुथवर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. २८ जून) रोजी शहरात मोठ्या उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
शहरातील विविध अंगणवाड्या, शाळा तसेच विशेष पथकांच्या माध्यमातून एकूण २,०४१ बालकांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी १,७६९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली.
आरोग्य विभागाने बूथ, मोबाईल टीम आणि ट्रान्झिट टीमच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मोहिमेत अनेक केंद्रांवर समाधानकारक प्रतिसाद मिळाला असून काही भागांत शंभर टक्क्यांच्या जवळपास लसीकरण पूर्ण करण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन पालकांना जनजागृती करत लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. शहरातील विविध केंद्रांवर सकाळपासूनच पालकांनी आपल्या लहान मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यासाठी गर्दी केली.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उर्वरित बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी घरभेटी व विशेष पाठपुरावा मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य अधिकाऱ्यांनी पालकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या मुलांना अद्याप पोलिओचे डोस मिळाले नसतील त्यांनी तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या पाल्याला पोलिओ प्रतिबंधक लस द्यावी.असे आवाहन केले.
उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ चंचल बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेंद्र मडके, डॉ अविनाश मोरे, डॉ गौरव आंनदगावकर, डॉ ओंकार खराडे, सहाय्यक अधीक्षक अविनाश धरणे, परिसेविका श्रीमती निर्मला तोडकरी, मनिषा होगले, मस्तुद चंद्रभागा, सुमन फुले, अश्विनी शेरखाने, गजानन डावरे, यासह आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.