नळदुर्ग : अन्यायग्रस्त बंजारा समाजास न्याय देण्याकरिता कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड  यांचा पाठपुरावा - संकेत चव्हाण 


नळदुर्ग,दि.१४ :


"बंजारा विरासत" संघाच्या माध्यमातून नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोड लगत असलेल्या अन्यायग्रस्त बंजारा कुटुंबास न्याय देवुन प्रशासकीय पातळीवर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगुन लवकरच राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड याविषयी बैठक घेऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई निवासी स्वीय सहाय्यक संकेत चव्हाण यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या ग्रामीण भागातील विविध प्रशासकीय अडचणी, समस्या जाणून घेवुन ते सोडविण्याच्या दृष्टीने 
राज्याचे मृद व जलसंधारण खात्याचे  कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांच्या आदेशाने  मुंबई येथील त्यांचे  स्वीय सहाय्यक संकेत चव्हाण यांनी नळदुर्ग येथे बंजारा कुटूंबास शनिवार दि.१३ जुन रोजी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.

नळदुर्ग येथील बंजारा कुटुंबावर सन २०१५ साली न.प. प्रशासनाने अन्याय करत ५० पेक्षा अधिक घरे पाडून बेघर केले. यास १६ वर्ष उलटत आले, प्रशासनाच्या अन्यायमुळे विस्थापित झालेलले कुटूंब शासनाकडून आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे बंजारा कुटूंबानी सांगत आपल्या समस्या व अडचणी मांडल्या. 

प्रारंभी मान्यवरांच्या हास्ते श्री सेवालाल महाराज व श्री जगदंबा मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी अँड राज राठोड, ना. संजय राठोड  यांचे समर्थक सचिन राठोड, अनिल चव्हाण, रवि महाराज राठोड, संजय जाधव, पत्रकार शिवाजी नाईक, विनोद जाधव, अशोक बंजारे, सचिन सुभाष राठोड, प्रदीप पवार आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

 
Top