नळदुर्गात हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांना विविध उपक्रमांतून अभिवादन
प्रतिमापूजन, ध्वजारोहण, वृक्षारोपण व रक्तदान शिबिरातून जयंती उत्साहात

नळदुर्ग, दि. २ जुलै :

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त बुधवारी नळदुर्ग शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिमापूजन, ध्वजारोहण, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश देत जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.आयोजित रक्तदान शिबिरात ४२ दात्यानी रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत कृषी, सिंचन, ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्पही केला. समाजोपयोगी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

कार्यक्रमास नगराध्यक्ष बसवराज धरणे,
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील, तालुका अध्यक्ष अँड अरविंद बेडगे,नगरसेवक आकाश कुलकर्णी, शशिकांत पुदाले,नगरसेविका 
छमाबाई राठोड, संदीप सुरवसे, हारिश जाधव, रवी महाराज राठोड, दत्ता राठोड, सुरेश राठोड, कैलास चव्हाण, अमृता चव्हाण, नायक फुलचंद राठोड, कारभारी विनायक जाधव,  लक्ष्मण चव्हाण,  प्रवीण पवार, , शिवाजी चव्हाण, नितीन राठोड, ,  एम.पी.राठोड, धनु राठोड ,मोहन चव्हाण, संतोष चव्हाण, सुर्यकांत राठोड, बालाजी राठोड, आकाश जाधव आदीसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त आयोजित उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले.


 यावेळी अनेक मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श समाजाने स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण, शेती, सामाजिक समता आणि विकासाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर असल्याचे  सांगितले.


 
Top