नंदगावच्या उपसरपंचपदी रेणुका गुड्डे यांची बिनविरोध निवड ; भाजपच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवड; ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

नळदुर्ग, दि.११ जुलै:

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. रेणुका नवनाथ गुड्डे यांची शुक्रवारी (दि. १०) बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली.

निवड प्रक्रियेस जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिद्धेश्वर (अण्णा) कोरे, निवडणूक अधिकारी डी.एस नडगिरी, सरपंच स्वामिनी विद्यानंद घंटे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नागिले, धनराज कलशेट्टी, सौ. मीनाक्षी मोरे, सौ. नंदाबाई कामशेट्टी, सौ. महादेवी चिनगुंडे, सौ. कमलबाई काटे यांच्यासह ग्रामस्थ प्रशांत बाबा करंडे, मल्लिनाथ कामशेट्टी, चिदानंद बशेट्टी, भीमराव चिनगुंडे, बसवराज कोरे, श्रद्धानंद अरबळे, दिलीप बिराजदार, मल्लिनाथ गुड्डे, विश्वजीत घंटे, परमेश्वर चिनगुंडे, रहीम शेख, विश्वजीत येणेगुरे, सागर चौगुले, सचिन कोरे, सूरज गुड्डे आदी उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच सौ. रेणुका नवनाथ गुड्डे यांचा उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करत ग्रामविकासासाठी प्रभावी काम करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. 


 
Top