कोषाध्यक्षपदी धिमाजी घुगेची निवड;
भाजप ओबीसी मोर्चाच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीत तुळजापूर तालुक्याला मोठे प्रतिनिधित्व
नळदुर्ग,दि.११जुलै :
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, धाराशिव जिल्ह्याच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या संघटनात्मक कार्यकारिणीत तुळजापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विजय सुधाकर शिंगाडे यांनी जाहीर केलेल्या ६१ सदस्यीय कार्यकारिणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, युवा अध्यक्ष, सोशल मीडिया संयोजक, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तसेच सदस्य अशा विविध पदांवर तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्षपदी विजय सुधाकर शिंगाडे (कसई) यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी दीपक घोडके (अणदूर), उमेश गवते (तुळजापूर), बाबा श्रीनामे (कार्ला) यांची निवड झाली आहे. सचिवपदी प्रवीण पवार (नळदुर्ग) यांना संधी देण्यात आली असून, कोषाध्यक्षपदी धिमाजी घुगे (नळदुर्ग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा अध्यक्षपदी बाळासाहेब वाडकर (वडगाव), सोशल मीडिया संयोजकपदी अमोल हुबाळे (येवती), तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी बालाजी लोखंडे (करजखेडा) यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय सदस्य म्हणून रामभाऊ माळी (आळणी), विद्या बिराजदार (वागदरी), सुरेखा कलशेट्टी (नंदगाव), नागनाथ घोडके (धनगरवाडी), तुकाराम माळी (काटगाव), आच्युत राऊत (सावरगाव), संजय विठ्ठल जाधव (नळदुर्ग) आदी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने भाजप ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
"धिमाजी घुगे यांनी १९९० पासुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजयुमोच्या शहराध्यक्षपदी उल्लेखनिय कार्य केले. त्यानंतर घुगे हे सलग दोन वेळेस भाजप नळदुर्ग शहराध्यक्षपद भुषविले." निवड झाल्याबद्दल घुगे यांचे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी अजय देशपांडे यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.