जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबद्दल शाहबाज काझी यांचा सत्कार; समर्थकांकडून एमआयएम कार्यालयात अभिनंदन; पुढील वाटचालीस शुभेच्छा
नळदुर्ग, दि. ३० जुलै :
एआयएमआयएमच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष शाहबाज काझी यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी नळदुर्ग शहरातील पक्षाच्या कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अझर रब्बानी शेख मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात शाहबाज काझी यांना पुष्पहार व शाल- घालून गौरविण्यात आले. यावेळी जाबेर कुरेशी, अली कुरेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी शाहबाज काझी यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करत जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. शाहबाज काझी यांनी सत्काराबद्दल उपस्थितांचे आभार मानत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.