भाजप ओबीसी आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नळदुर्गात सत्कार
पक्षवाढीसाठी 'एसआयआर' कामाचा आढावा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
नळदुर्ग, दि. ३१ जुलै :
भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या धाराशिव जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडीनंतर नळदुर्ग येथील भाजप कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचा नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजप ओबीसी आघाडीच्या धाराशिव जिल्हा कोषाध्यक्षपदी धिमाजी घुगे यांची, तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संजय विठ्ठल जाधव यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल नगराध्यक्ष बसवराज धरणे तसेच नगरसेवकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे सुशांत भूमकर, नगरसेवक तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, रिजवान काजी, छमाबाई राठोड, निरंजन राठोड, प्रवीण गायकवाड, अभियंता स्वप्नील काळे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, सुदर्शन पुराणिक, सुनील उर्फ बबन चौधरी, अक्षय भोई, किशोर नळदुर्गकर, उमेश नाईक, संदीप गायकवाड तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वीय सहाय्यक अबुल हसन रजवी आदी उपस्थित होते.
दरम्यान, सत्कार समारंभापूर्वी भाजप कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने 'एसआयआर' कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्षविस्तार आणि आगामी संघटनात्मक उपक्रमांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.