रामरक्षा आंदोलनांतर्गत नळदुर्गात हनुमान पूजन व हनुमान चालीसा पठण

नळदुर्ग, दि.५ जुलै : 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या 'रामरक्षा आंदोलन' अंतर्गत नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि. ५ जुलै) शास्त्री चौकातील हनुमान मंदिरात रामभक्त हनुमान मूर्ती पूजन व हनुमान चालीसा पठणाचा भक्तिमय कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात माजी उपजिल्हाप्रमुख  कमलाकर  चव्हाण यांच्या हस्ते रामभक्त हनुमान मूर्तीचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित शिवसैनिक, रामभक्त आणि नागरिकांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. यावेळी परिसर 'जय श्रीराम' आणि जय हनुमान' च्या जयघोषाने दुमदुमून गेला. 

शहर व परिसरातील  नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.याप्रसंगी उपतालुकाप्रमुख  सरदारसिंग ठाकूर,  शहरप्रमुख   संतोष पुदाले, उपशहरप्रमुख  शाम कणकधर, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष  सिद्धेश्वर सुभाष विभुते,  सोमनाथ म्हेत्रे,  पत्रकार  विलास येडगे, नगरसेवक  तानाजी जाधव,  श्रीकांत पोतदार,  राजू वैद्य,  खंडू माने,  लक्ष्मण कांबळे, अप्पा घाटे यांच्यासह रामभक्त, हनुमान भक्त, शिवसैनिक, युवक, ज्येष्ठ नागरिक  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संतोष पुदाले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांनी मानले.
 
Top