लोहारात भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांचा जाहीर सत्कार; युवक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गौरव; कार्यकर्त्यांशी साधला संवाद
लोहारा, दि. १६ जुलै :
लोहारा शहरातील युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्या प्राथमिक शाळा, मागासवर्गीय सरस्वती कन्या माध्यमिक विद्यालय संलग्न सावित्रीबाई फुले मागासवर्गीय तालुका कन्या वसतीगृह (आश्रमशाळा) येथे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मल्हार पाटील यांनी गुरुवारी (दि. १६) सदिच्छा भेट दिली. यावेळी युवक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष व सचिव सुरेश गुंडेराव वाघ यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुंडेराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील, दयानंद शिंदे, भाजपा उमरगा-लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवराज जाधव, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, विष्णू नारायणकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
सत्कारानंतर युवा नेते मल्हार पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करताना शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि युवकांनी राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली. समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास नगरसेवक प्रशांत काळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दगडू तिगाडे, उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, तालुका सरचिटणीस प्रवीण चव्हाण, निकेश बचाटे, जयेश सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष मोहन जेवळीकर, सचिन सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, समीर शेख, शरीफ बागवान, संभाजी विरुदे, महेबुब फकीर, सुरेश थोरात, ॲड. राहुल भोंडवे, केदार सातपुते, भगवान सातपुते, गोपाळ सातपुते, राम जाधव, राहुल बोबडे, प्रतिक विरुदे, शहानवाज बागवान, शिवा चपळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी युवा नेते मल्हार पाटील यांचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला शुभेच्छा दिल्या.