आलियाबादच्या विकासकामांचे डॉ. रामचंद्र नायक यांच्याकडून कौतुक; ग्रामस्थांकडून सहपत्निक भव्य सत्कार
नळदुर्ग, दि. १६ जुलै :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे तेलंगणा राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र नायक यांनी सदिच्छा भेट देत गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विकास उपक्रमांची माहिती घेत समाधान व्यक्त केले.
भेटीदरम्यान डॉ. नायक यांनी गावातील वाचनालयालाही भेट देऊन तेथील सुविधा व उपक्रमांची पाहणी केली. शिक्षण, सामाजिक विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांचे त्यांनी कौतुक करत ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.
यावेळी आलियाबाद ग्रामस्थांच्या वतीने डॉ. रामचंद्र नायक व त्यांच्या सहचारिणींचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत गावाशी असलेले आत्मीय नाते अधिक दृढ केले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच सूर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, हनुमंत नायक, नंदू तेजावत, डॉ. रमेश लोकावत, डॉ. गिरीधर, ओएसडी भगवान नायक, प्रमिला नायक, ज्योतीका चव्हाण, सुभाष नाईक, विनायक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, शिवाजी चव्हाण, माणिक राठोड, महादेव राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड, सुभाष चव्हाण, सुभाष राठोड, तानाजी राठोड, ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड, अमोल चव्हाण, सुनील चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.