भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची आमदार बसवराज पाटील यांना मुरुम येथे सदिच्छा भेट; तुळजाभवानीची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार; राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा

मुरूम, ता. उमरगा, दि. २४ जुलै :

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २३) विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांच्या मुरुम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत राजकीय घडामोडींना वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले. या भेटीदरम्यान विविध राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
यावेळी आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा तुळजाभवानीची भव्य प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पाटील परिवाराच्या वतीनेही त्यांचे आदरातिथ्य करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष शरण पाटील, उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपचे नेते गणेश हाके, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, संपदा शरण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भेटीच्या निमित्ताने धाराशिव व लातूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील भाजप संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


 
Top