धर्मसेवेच्या ५३ वर्षांच्या अखंड तपश्चर्येला मानाचा मुजरा; अहंकारी परिवाराचा ब्राह्मण युवकांकडून भव्य गौरव
नळदुर्ग, दि. ३१ जुलै :
नळदुर्गच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेला गेली तब्बल ५३ वर्षे अखंडपणे जपणाऱ्या अहंकारी परिवाराचा गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर ब्राह्मण युवकांच्या वतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला.
भागवत सप्ताहाच्या माध्यमातून शेकडो भाविकांमध्ये भक्तीचा जागर निर्माण करणाऱ्या या परिवाराच्या सेवाभावी कार्याचा यावेळी कृतज्ञतेने गौरव करण्यात आला.
नळदुर्ग शहरात आदर्श शिक्षक वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अहंकारी परिवाराकडून गेली ५३ वर्षे अखंड भागवत सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.
सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून जाते. दररोज शेकडो महिला भागवत कथा श्रवणासाठी उपस्थित राहतात, तर १५० ते २०० भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्ताहाची सांगता करण्यात आली, या दिवशी नळदुर्गसह परिसरातील भाविक उत्सवात सहभागी झाले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून सेवा, श्रद्धा आणि संस्कारांची परंपरा अहंकारी परिवार आजही अविरतपणे जपत आहे. या उल्लेखनीय धार्मिक योगदानाचा गौरव म्हणून ब्राह्मण युवकांनी कृतज्ञतापूर्वक हा सत्कार सोहळा आयोजित केला.
नळदुर्ग ब्राह्मण समाजाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी सौ. वनमाला व वसंतराव अहंकारी, सौ. माधुरी व बळवंत अहंकारी, सौ. अश्विनी व विकास अहंकारी, सौ. वर्षा व वैभव अहंकारी, सौ. अदिती व योगेश अहंकारी तसेच सौ. राणी व सुनील पाटील यांच्यासह संपूर्ण अहंकारी परिवाराचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रदीप जोशी, उमेश नाईक, सचिन भूमकर, अजित भुमकर ,प्रदीप ग्रामोपाध्ये, संदीप वैद्य, राजकुमार वैद्य, संतोष नाईक, अजय देशपांडे, सौरभ रामदासी, संकेत भूमकर, स्मितेश जोशी, मयूर जोशी, मनोज कुलकर्णी, आशुतोष नाईक यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक युवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक परंपरेचा वारसा जपत समाजात भक्ती, संस्कार आणि सेवाभावाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणाऱ्या अहंकारी परिवाराच्या कार्याला उपस्थितांनी यावेळी मनःपूर्वक दाद दिली.