बसस्थानक परिसर हिरवागार करण्याचा संकल्प; नळदुर्ग बसस्थानकात वृक्षारोपण
नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते उपक्रम; परिवहन विभागाचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश
नळदुर्ग, दि. १४ जुलै :
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नळदुर्ग बसस्थानक परिसरात मंगळवार दि. १४ जुलै रोजी एस. टी.महामंडाळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा
उपक्रम उत्साहात पार पडला.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे आयोजन विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधवर तथा तुळजापूर आगारप्रमुख महेश रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी नळदुर्ग नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे व नगरपरिषदेचे बांधकाम सभापती शशिकांत पुदाले यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. बसस्थानक परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास तुळजापूर आगारातील अकाउंटंट सुधीर बामनकर, नळदुर्ग वाहतूक नियंत्रक महेश डुकरे, अनिल हांडे, मुकुंद वैद्य, सफाई कर्मचारी लहू देढे, स्वामी तसेच जमादार इजमाम शेख यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारत, पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.