दलित मित्र मोतीराम चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श जपण्याचा संकल्प;पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे गौरवोद्गार

नळदुर्ग, दि. २३ जुलै :

"दलित मित्र मोतीराम चव्हाण यांनी आयुष्यभर समाजातील तळागाळातील घटकांसाठी निस्वार्थपणे कार्य केले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे," असे गौरवोद्गार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काढले.

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे दलित मित्र मोतीराम चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाजसेवेची परंपरा जपत शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, माजी सभापती प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सदस्य आशिष सोनटक्के, जळकोटचे सरपंच गजेंद्र कदम, आलियाबादचे सरपंच सूर्यकांत चव्हाण, रामतीर्थचे सरपंच लक्ष्मण राठोड, महेश कदम, कृष्णात मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत पाटील, अरुण लोखंडे, अनिल छत्रे, उपसरपंच अमृता चव्हाण व बबन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निवृत्त गटविकास अधिकारी टी. एन. चव्हाण, दिलीप सोमवंशी, शंकर चव्हाण, डी. डी. कदम, विजय मोरे, पंडित कदम, सुनील माने, संजय माने, संजय अंगुळे, माजी चेअरमन राजू पाटील, बसवराज कवठे, नेमिनाथ चव्हाण, अमोल चव्हाण, सुभाष नाईक, वाय. के. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत राठोड, विनायक चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील, माणिक राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड, थावरू राठोड, गणेश चव्हाण, देविदास चव्हाण, महादेव राठोड, बाबुराव चव्हाण, व्यंकट राठोड, हरीष जाधव, रामू चव्हाण, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे, संस्थेच्या शाळेचे प्राचार्य संतोष चव्हाण, मुख्याध्यापक विनायक राठोड, ए. जी. पवार, शिवाजी कवठे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ  उपस्थित होते.

कार्यक्रमात दलित मित्र मोतीराम चव्हाण यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
 
Top