नळदुर्ग शहरात SIR विशेष मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाला वेग; नागरिकांना मुदतीत फॉर्म भरण्याचे आवाहन

नळदुर्ग, दि.२२ जुलै : 

नळदुर्ग शहरातील भाग क्रमांक ३५० ते ३६६ मध्ये SIR विशेष मतदार पुनरिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध व सुरळीतपणे सुरू असून या अभियानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या कार्यक्रमांतर्गत संबंधित भागातील मतदारांना आवश्यक अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम BLO व त्यांच्या सहायकांकडून करण्यात येत आहे. पात्र मतदारांनी आवश्यक ती माहिती व कागदपत्रांसह विहित मुदतीत फॉर्म भरून सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे  नगरपालिकेचे च  मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे यांनी आवाहन केले.

 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top