क्रीडा क्षेत्रात नळदुर्गची मान उंचावली; विद्यापीठाकडून नऊ गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचा होणार गौरव

नळदुर्ग, दि. ३ ऑगस्ट :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय व विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा गौरव करण्यात येणार आहे.

 यामध्ये नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नऊ जणांची निवड झाली असून महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील श्रीशंभो पेठे, अथर्व धाने, जानार्दन सावंत, मेनका अमृता, सोनसुरकर दीक्षा, मडके गौरी, सांध्या सुरवसे, भोसले श्वेता तसेच डॉ. कपिल सोनटक्के (व्यवस्थापक) यांचा या समारंभात गौरव होणार आहे. खेळाडू विद्यार्थ्यांनी खो-खो आणि क्रीडा महोत्सव स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगांवकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे, सहसचिव शहाबाज काझी, प्रकाश चौगुले, संचालक बाबुराव चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, उपप्राचार्य ए.टी.कदम प्राध्यापक, विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींनी सर्व निवड झालेल्या खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन केले असून आगामी स्पर्धांमध्येही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात 
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top